(फलटण /प्रतिनिधी)- एकच निर्धार बौद्ध आमदार या उक्तीनुसार फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला येणारा विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.याबाबत अधिक माहिती देताना संविधान समर्थन समितीचे सदस्य म्हणाले की, यावर्षी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघा मधून आमदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून सर्व समाज एकत्रित आला असून आरक्षण असलेला फलटण कोरेगाव मतदार संघात गेल्या ३ विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे २००९/२०१४/२०१९ पासून आरक्षण असताना देखील फलटणच्या कोणत्याच राष्ट्रीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी गेल्या १५ वर्षापासून आमच्या समाजाला उमेदवारी दिली नसून आमच्यावर अन्याय केला आहे.
तरी पवारसाहेब आपल्याकडे राज्यातील पुरोगामी विचाराचे वारसदार म्हणून आम्ही पाहत आहोत.तरी साहेब आपण यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या समाजाला संधी द्यावी अशी मागणी ही संविधान समर्थन समितीच्या वतीने करीत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.