आपला जिल्हा

फलटण नगरपालिकेत विरोधी शिवसेना नगरसेवकांची उपेक्षा.? बसायला केबिनही नाही : जनतेशी संवाद साधायचा कसा.?

(फलटण /प्रतिनिधी ) शिवसेनेच्या गटनेत्त्यानी विरोधी पक्षासाठी अशी सामूहिक केबिनची मागणी केली आहे की नाही याबाबतची अधिकृत माहिती आम्हास उपलब्ध झाली नाही. परंतु मागणी करून विरोधी पक्षाला केबिन दिली जात नसेल तर तो सत्तारूढ पक्षाचा मनमानी कारभार म्हणावा लागेल. मात्र अध्याप तरी शिवसेनेच्या नगरसेवकांकडे प्रभागातून आलेल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी व बसून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र दालन नाही हे मात्र तितकेच खरे आहे.

  बसण्यासाठी फलटण नगरपालिका येथे विरोधी शिवसेना नगरसेवकांना केबिन नाही

▪️ ९ नगरसेवक निवडून, १ स्वीकृत सदस्य १अनुभवी
▪️ ८ नगरसेवक प्रथमच निवडून; ५ महिला, ३ पुरुष
▪️ सामूहिक केबिनची मागणी प्रलंबित..?
▪️ नागरिकांशी संवाद साधण्यात अडचणी

मुख्य प्रश्न :
लोकप्रतिनिधींनाच बसण्यासाठी जागा नसेल, तर जनतेच्या समस्या कशा मांडल्या जाणार..?

मागणी :
विरोधी नगरसेवकांना तातडीने स्वतंत्र सामूहिक केबिन उपलब्ध करून द्यावी.

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठीही जागा नसल्याची आजची तरी धक्कादायक परिस्थिती सध्या नगरपालिकेत पाहायला मिळत आहे.नगरपालिकेत शिवसेनेचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले आहेत तर १ नगरसेवक स्विकृत आहे. यामध्ये फक्त एकच नगरसेवक अनुभवी असून उर्वरित ८ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या ८ नगरसेवकांमध्ये ५ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. एखादा अपवाद वगळला तर सर्वच नवीन नगरसेवक असल्याने थोडे गोंधळाची परिस्थिती आहे.

मात्र या नवोदित नगरसेवकांना कामकाजासाठी कोणतेही स्वतंत्र  दालन देण्यात आलेले नाही. असे एका शिवसेनेच्या नगरसेवकाने नाव न घेण्याच्या अटीवर हि माहिती दिली आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच बसण्यासाठी जागा नसेल, तर नागरिकांच्या समस्या कशा सोडवल्या जाणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. फलटण नगरपालिकेतील या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत असून, विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांतून तातडीने स्वतंत्र  उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button