ताज्या घडामोडी

शिक्षण आणि आरोग्याचा संदेश देणारी ‘मिनी मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन’ उत्साहात संपन्न

फलटण दि. ४ : कौशल्याधारित शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजामध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे हा महत्त्वाचा संदेश समाजात पोहोचविण्याचा उद्देशाने फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण या स्वायत्त महाविद्यालयाच्यावतीने आयोजित मिनी मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन या स्पर्धेस फलटण शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी/ विद्यार्थिनी तरुण वर्ग आणि नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत महाविद्यालयाचा उद्देश सफल केला.

 या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. कौशल्याधारित शिक्षण ही आजच्या काळाची गरज असून त्याचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे सांगत महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात रुजविणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. स्पर्धेत सहभागी सर्व धावपटूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
फलटण शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यावरून आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटांतील शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेदरम्यान शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास फलटण एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार हेमंत रानडे, सोसायटी नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, शिरीष दोशी, शिरीष भोसले, शिवाजीराव घोरपडे, पराग दोशी, नितीन गांधी, सोसायटी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य देशमुख यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत मुला-मुलींसाठी ३ स्वतंत्र वयोगट ठेवण्यात आले होते. प्रत्येक गटात चुरशीची स्पर्धा पहायला मिळाली. विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते – *१० ते १७ वर्षे वयोगट* मुले : प्रथम – ओंकार धनाजी सरगर, द्वितीय – पियुषकुमार बाळासाहेब घुगे.
मुली प्रथम – अबोली नंदकुमार वासके, द्वितीय – आराध्या माणिक वासके.
*१८ ते ३९ वर्षे वयोगट* पुरुष : प्रथम – चैतन्य मुकिंदा रुपनर, द्वितीय – अनिकेत हरीबा देशमुख. महिला : प्रथम – साक्षी संजय जाड्यल, द्वितीय – ज्ञानेश्वरी पोपट पोकळे.

*४० वर्षांवरील वयोगट* पुरुष : प्रथम – माणिक नारायण कांबळे, द्वितीय – विशाल धोंडिबा शिळीमकर. महिला : प्रथम -जेन वांजिरु (केनिया), द्वितीय – रंजना दत्तात्रय शेंडकर.
महिलांच्या ४० वर्षांवरील गटात केनियाच्या जेन वांजिरु यांनी दमदार आणि वेगवान धावण्याच्या कौशल्य आधाराने विजेतेपद पटकावत स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरल्या.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी उपस्थित मान्यवर, पोलीस प्रशासन, क्रीडाप्रेमी नागरिक, स्वयंसेवक, वैद्यकीय विभागाचे कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि स्पर्धकांचे आभार मानले.
शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध स्तरांतून महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button