(फलटण/प्रतिनिधी ): फलटण तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती फलटण तालुका सकल धनगर समाज यांच्या वतीने देण्यात आली आहे.
हा जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि समाजबंधूंमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, फलटण येथे करण्यात आले असून दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ३० मे रोजी रात्री १२ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच परिसरात भक्तिमय वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्यानंतर दि. ३१ मे रोजी दिवसभर विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे.
जयंतीच्या निमित्ताने परिसरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात येणार असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली आहे .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात समाजहित, न्याय, धर्म आणि लोककल्याण यासाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
या जयंती महोत्सवात फलटण तालुक्यातील सर्व सकल धनगर समाज बांधव, युवक-युवती तसेच भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन फलटण तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button