आपला जिल्हा

५ जून रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा

२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन

(पुणे /क्रिडा प्रतिनिधी) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

राज्यातील पंचांना राष्ट्रीय स्तरावर संधी

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

२ जूनपर्यंत नोंदणीची मुदत

इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी दि. २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी श्री. प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button