आपला जिल्हा

उदयजी सामंतांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा ; पदाधिकारी बैठकीसह सत्कार समारंभ

(फलटण /प्रतिनिधी ): शिवसेना २५५ फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या वतीने पदाधिकारी निवड आढावा बैठक, BLA-2 नोंदणी अभियान तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ बुधवार दि. २७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटन मजबुती, आगामी निवडणुकांची तयारी आणि पक्ष विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

तसेच BLA-2 नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.हा कार्यक्रम बुधवार दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता अनंत मंगल कार्यालय येथे होणार आहे.

शिवसेना २५५ फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या वतीने सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button