आपला जिल्हा

कृषि महाविद्यालय,फलटण येथे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक जोड कार्यक्रम अभ्यासक्रमाचा अभिमुखता कार्यक्रम संपन्न

 (फलटण/ प्रतिनिधी) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्नित फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषि महाविद्यालय, फलटण येथील कृषि पदवीच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील सातव्या सत्रातील (भाग 1) विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम अंतर्गत कृषि औद्योगिकजोड कार्यक्रमाचा अभिमुखता कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम अंतर्गत SRP-401 ग्रामीण भागातील कृषि अवलोकन, SRP- 402 कृषि संलग्नित संशोधन व संस्था अवलोकन, SRP- 403 वनस्पती चिकित्सालय अवलोकन, SRP- 404 कृषि औद्योगिकजोड अवलोकन इत्यादी अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढाल्पे यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम महत्व व अवलंबन, शैक्षणिक नियमावली याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम अंतर्गत बी.एस.सी. कृषी या पदवी मधील तांत्रिक व शास्त्रोक्त माहिती विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनाने तसेच अनेकविध कृषी उपक्रमांच्या माध्यमांतून परिसरातील शेतकरी, महिला, महीला बचत गट, सुशिक्षित तरूण बेरोजगारांना मार्गदर्शन व जनजागृती करून शेतकऱ्यांच्या विविध शंकाचे निरसन विद्यार्थ्यांनी करावे, विद्यार्थ्यांनी विद्यापीठीय शैक्षणिक नियमावलीनुसार ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम राबवण्यात यावा असे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रमाचे प्रा. रश्मी नाईकवाडे यांनी कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रम, निवड व राबविण्याचे तंत्रज्ञान, नियोजित कालावधीनुसार करावयाची कामे व अहवाल या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

सदरील कार्यक्रमासाठी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिकजोड कार्यक्रम अभ्यासक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. ए. साळुंखे व प्रा. एन. एस. पंडित, डॉ. जी. बी. अडसूळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. एस. ढाल्पे व आभार डॉ. जी. बी. अडसूळ यांनी व्यक्त केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button