(फलटण /प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा सातारा जिल्हा परिषदेचे माझ्या अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य द्रवीड सर, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे संजीवराजे म्हणाले की,छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या औचित्य साधून कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कॉलेजची प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या रक्तगटाची तपासणी करून आपत्कालीन रक्तदाता गट तयार करण्यात आला असून या आपत्कालीन रक्तदाता गटाचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाला प्रोजेक्टर भेट दिला आहे.
हा प्रोजेक्टरमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत यावेळी संजीवराजे यांनी व्यक्त केले.
Back to top button