आपला जिल्हा

हिंद केसरी कुस्ती स्पर्धांसाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील – जिल्हाधिकारी संतोष पाटील

(सातारा /प्रतिनिधी )- सातारा येथे दिनांक १४ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या ५० व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आज या स्पर्धांच्या अनुषंगाने तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

 

 आरोग्य विभागाने महत्त्वाच्या गरजेच्या औषधांचा पुरवठा ठेवावा व स्टाफचीही व्यवस्था करावी, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, आयोजकांनी खासगी रुग्णालयाची करार करून उपचारांची व्यवस्था व आय सी यू बेड राखीव ठेवावेत. येणाऱ्या स्पर्धकांच्या राहण्याची चांगली व्यवस्थ करावी. जास्तीत जास्त प्रेक्षक उपस्थित रहावेत यासाठी व्यवस्था करावी. प्रेक्षकांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था स्पर्धा स्थळी ठेवावी. कुस्ती आखाडे व प्रेक्षक यांच्या मध्ये बॅरिकेट लावावेत. पार्किंगची व्यवस्था ठेवावी. येणाऱ्या अतीमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची पर्यायी व्यवस्था करावी. वाहतूक व्यवस्थेसाठी आयोजकांनी पोलिस विभागाशी सामन्याने नियोजन करावे. उपस्थित असणाऱ्या अती महत्वाच्या व्यक्तींची माहिती लवकर द्यावी. सातारा शहराचे नाव देश पातळीवर उंचावेल, असे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करावी. विद्युत व्यवस्था तपासून योग्य असल्याची खात्री करावी,सर्व व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याची तपासणीसंबंधीत विभागाने करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button