आपला जिल्हा
महाराष्ट्र चेंबरच्या निवडणुकीत लोकशाहीचा नवा आदर्श ; रविंद्र माणगावे अध्यक्ष, करुणाकर शेट्टी वरिष्ठ उपाध्यक्ष
99 वर्षांच्या इतिहासात प्रथमच विदर्भातून उपाध्यक्षपदाची निवडणूक; शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर ऐतिहासिक घडामोड

(मुंबई/ प्रतिनिधी) : शताब्दी वर्षाच्या दिमाखदार उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वात प्रभावी व्यापारी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील शिखर संस्थेने लोकशाहीची भक्कम परंपरा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या 2026-28 कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुका उत्साह, शिस्त, पारदर्शकता आणि सदस्यांच्या अभूतपूर्व सहभागाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. सुमारे 7,000 थेट सदस्य व 20 लाखांहून अधिक व्यापारी, उद्योजक आणि औद्योगिक घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर लोकशाहीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
व्यापारविश्वाचा विश्वास काय ; रविंद्र माणगावे अध्यक्षपदी
महाराष्ट्र चेंबरवर रविंद्र माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून ही निवड पाहिली जात आहे. राज्यातील आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेंबर आणखी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘रोड रोलर’ विरुद्ध ‘विमान’ ; रंगली चुरशीची लढत
यंदाच्या निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ (रोड रोलर) आणि ‘प्रगती पॅनेल’ (विमान) यांच्यात अत्यंत अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीने सदस्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.
वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी करुणाकर शेट्टी यांनी 1885 मतांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
तीन विभागांत दमदार विजय ; नव्या नेतृत्वाची एंट्री
उपाध्यक्षपदासाठी पुढील उमेदवारांनी सुध्दा विजय संपादन केला. सुनिता फाल्गुने (नाशिक), संतोष राणे (कोकण) व महेंद्र अगरवाल (उत्तर महाराष्ट्र) या विजयामुळे विविध विभागांना सक्षम आणि समन्वय साधणारे नेतृत्व मिळाले आहे.
सहा उपाध्यक्ष बिनविरोध ; संघटनात्मक एकतेचे दर्शन
पुढील पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली :डॉ. धनश्री हरदास (मुंबई-1), किरण भोसले (मुंबई-2), संजय शेटे (पश्चिम महाराष्ट्र-1), सरजेराव नलावडे (पश्चिम महाराष्ट्र-2), संजय किर्दत (मराठवाडा), सिद्धार्थ रुहाटिया (विदर्भ)मुंबई विभागातून २० गव्हर्निंग कौन्सिल सदस्य बिनविरोध निवडून आले असून त्यांच्यासह विविध विभागांतील गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली. यामुळे संस्थेतील एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित झाली.
99 वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडला ऐतिहासिक क्षण



