आपला जिल्हा
विडणी येथे ७ जूनला भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा ; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

(फलटण प्रतिनिधी )पुरुषोत्तम (अधिक मास) निमित्त श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी विडणी येथे भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन घडविणारा हा आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार असून, या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री शंकरगीता पारायण सोहळा
दिनांक : रविवार, ७ जून २०२६
स्थळ : सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर, विडणी, ता. फलटण, जि. साताराकार्यक्रम वेळापत्रक :
• सकाळी १०.०० वा. – श्रींच्या पादुकांचे दर्शन
• सकाळी ११.०० वा. – पादुकांना अभिषेक
• दुपारी १२.०० वा. – आरती
• दुपारी १.०० वा. – भव्य श्री शंकरगीता पारायण
• सायं. ५.३० वा. – महाआरती
• सायं. ६.०० वा. – महाप्रसादसंपर्क :
मिलिंद कदम – ९५५२७११७७७
निखिल (बाबूदादा) वाघमारे – ८३०८४०५०१७



