ताज्या घडामोडी

देवत्व बेकर्सच्या बेल्जियम चॉकलेट केकचे फलटणमध्ये उत्साहात लोकार्पण

फलटण प्रतिनिधी : देवत्व बेकर्सच्या नव्या बेल्जियम चॉकलेट केकचे लोकार्पण बुरुड गल्ली, कसबा पेठ, फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार अजय माळवे, आरटीओ अधिकारी करणसिंह लेंभे, ॲड. रोहित अहिवळे, सचिन मोरे, शक्ती भोसले, युवा पत्रकार तथा उद्योजक शेखर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच देवत्व बेकर्सचे संचालक पत्रकार यशवंत खलाटे पाटील, विशाल शेंडे, अजंठा हेअर स्टाईलचे निलेश गायकवाड, प्रथमेश खलाटे पाटील आणि आरव गणेश सावंत पाटील हेही कार्यक्रमाला उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते बेल्जियम चॉकलेट केकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देवत्व बेकर्सच्या नव्या उत्पादनाचे कौतुक करत ग्राहकांना दर्जेदार व स्वादिष्ट उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button