आपला जिल्हा

राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव पुरस्काराने फलटणच्या सौ. पल्लवी कदम यांचा सन्मान

पंढरपूर येथील ५ व्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात गौरव ; मठाचीवाडी गावासह तालुक्यात आनंदाचे वातावरण

(फलटण /प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथील रहिवासी सौ. पल्लवी किशोर कदम यांना पंढरपूर येथे आयोजित ५ व्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात “राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. सुलेखन (कॅलिग्राफी), डिझाईन आणि डेकोरेशन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांच्या या यशामुचीवाडी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर येथे दि. २२ ते २४ मे दरम्यान हे ५ वे राज्यस्तरीय अक्षर संमेलन उत्साहात पार पडले. अक्षरकलेचे संवर्धन, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच नवोदित कलावंतांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील अनेक नामवंत कलाकारांनी या संमेलनात सहभाग नोंदविला.
संमेलनाचे अध्यक्ष मा. शुभम गायकवाड यांच्या हस्ते सौ. पल्लवी कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (IPS), महसूल व वन विभागाचे उपसचिव संजय इंगळे, माजी न्यायाधीश योगेश पाटील, सभापती शुभम आगवणे यांच्यासह कला क्षेत्रातील ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे, अक्षर मित्र अमित भोरकडे, प्रशांत वाघमारे आणि ज्ञानेश्वर विजागत आदी मान्यवर उपस्थित होते.

सुलेखन आणि डिझायनिंग क्षेत्रात सौ. पल्लवी कदम यांनी सातत्यपूर्ण आणि सृजनशील कार्य करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मठाचीवाडी ग्रामस्थांसह फलटण तालुक्यातील सामाजिक, राजकीय व कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button