(फलटण /प्रतिनिधी ): दरवर्षी २३ जून रोजी जगभरात आणि भारतात ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा केला जातो. खेळातील कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, सक्रिय जीवनशैली तसेच जागतिक एकता व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर पुणे येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात फलटणचे सुपुत्र श्री. लखन मोरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. सॉफ्ट हॉकी या खेळाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले असून, आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर भारतीय संघाला दैदिप्यमान यश मिळवून दिले आहे.
लखन मोरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.
Back to top button