क्रीडा व मनोरंजन

पर्यावरण संरक्षणासाठी विषारी रसायनांची माहिती महत्त्वाची – सुशांत अहिवळे

(फलटण /प्रतिनिधी)- फलटण व फलटण शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जाणीव व महत्त्व पटवून देतानाच त्यांना विषारी रसायने त्या रसायनांचा प्रकार स्रोत परिणाम आणि प्रतिबंध या महत्त्वपूर्ण विषयाची माहिती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुशांत अहिवळे सर यांनी केले.

फलटण शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील एकूण १५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी “विषारी रसायने: प्रकार, स्रोत, परिणाम आणि प्रतिबंध” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन कंमिन्स इंडिया फाउंडेशन व इको सर्क्युलर इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अहिवळे सर बोलत होते.या उपक्रमांतर्गत एकूण ५० सत्रे (Sessions) घेण्यात आली. यामध्ये सुमारे २५३२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, तसेच ११० शिक्षकांनाही या विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली.

या व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विषारी रसायनांची ओळख करून देत त्यांच्या विविध प्रकारांबद्दल (न्यूरोटॉक्सिन्स, कर्करोगजन्य, उत्परिवर्तनजन्य इ.) सखोल माहिती देण्यात आली. तसेच ही रसायने आपल्या दैनंदिन जीवनात कुठे आढळतात—घरगुती वस्तू, औद्योगिक प्रक्रिया आणि प्रदूषण यामधून हे स्पष्ट करण्यात आले. तसेच सत्रादरम्यान या रसायनांच्या संपर्कामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले. त्वचेचे आजार, श्वसनाचे त्रास, कर्करोग, तसेच दीर्घकालीन आजार यांसारख्या गंभीर परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

यासोबतच प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष भर देण्यात आला. सुरक्षित हाताळणी, संरक्षणात्मक साधनांचा (PPE) वापर, योग्य साठवण व विल्हेवाट, तसेच पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

या सर्व उपक्रमातून समाजाला होणारा फायदा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये केवळ माहिती देणारा नसून त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारा ठरला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढते

पर्यावरण संवर्धनाची जाणीव मजबूत होते

घराघरात सुरक्षित सवयींचा प्रसार होतो

रसायनांचा योग्य वापर व धोके टाळण्याची सवय लागते

भविष्यात जबाबदार व सजग नागरिक तयार होण्यास मदत होते

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमार्फत संपूर्ण समाजात जनजागृती होऊन एक सुरक्षित, स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

शाळांमधील शिक्षक व व्यवस्थापनाने या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम पुढील काळातही सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button