क्रीडा व मनोरंजन
तालुका स्तरीय खो- खो स्पर्धा जावली राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली येथे मोठ्या उत्साहात संपन्न


मैदानी खेळातून विद्यार्थींचां मानसिक व बौद्धिक विकास होतो तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां अशा प्रकारे संधी मिळाल्याने राज्य स्तरीय खेळाडू घडतील , एकंदरीतच राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली यांचे शालेय खो – खो स्पर्धेचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे करण्यात आले होते असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी कार्यक्रमावेळी केले.
या स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, शारिरीक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दशरथ लोखंडे, जिल्हा क्रीडा समन्वय उत्तम घोरपडे, तालुका संघटनेचे सचिव आप्पासाहेब वाघमोडे, राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली चे प्राचार्या कांचन चवरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अमोल चवरे, उपस्थित होते.
स्पर्धा साठी विशेष सहकार्य काळुखे सर, काशीद सर,जाधव सर,ठोंबरे सर व सर्व महिला शिक्षिका, क्रीडा शिक्षक महादेव वाघमोडे सर , विद्यार्थी व शिक्षकेतर , माऊली माने, विशाल मोरे, किरण आगम,अनिल गावडे , संतोष गावडे गणेश सांगळे यांचे लाभले.
स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण व खेळाडूंसाठी पोषक अशी ठरली.