क्रीडा व मनोरंजन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फलटण तालुका व महिला आघाडी यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

(जावली/ अजिंक्य आढाव)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फलटण तालुका व महिला आघाडी यांच्या वतीने भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना प्रथम बक्षीस सोन्याची नथ , द्वितीय बक्षीस सोन्याची नथ, तृतीय क्रमांकाचे बक्षीस पैठणी, चतुर्थी क्रमांक बक्षीस सेमी पैठणी, पाचवी बक्षीस डिनर सेट अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक सभासदास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सहभागी सभासदांनी आपल्या. घरातील गौरी गणपती सजावटीचे दोन फोटो व तीस सेकंदाचा व्हिडिओ – 7083216845 /8149693237 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करावा.या बरोबर स्पर्धेकाचे नाव पत्ता व मोबाईल नंबर नमुद करणे आवश्यक आहे.