(जावली/अजिंक्य आढाव) – 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाच्या निमित्ताने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एक्सीड विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती (महाराष्ट्र) व लातुर सायन्स अकॅडमी बारामती यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव प्रा.अमोल दशरथ चवरे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवत फलटण पासून २२ किमी अंतरावर राॅयल इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनसाठी 6 ऑक्टोबर 2016 साली संस्थेची स्थापना करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र बिंदू ठरवलं. आज या इंग्रजी माध्यमिक शाळांमध्ये जावली,मिरढे,बरड, राजुरी कुरवली,आदरुंड या परिसरातील मुलं शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन शैक्षणिक बरोबर कला, क्रिडा आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.
या पूर्वी इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी शहराकडे लोंढेच्या लोंढे जायचे,मात्र आज ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी प्रा अमोल चवरे एक धाडसी निर्णय घेवून विद्यार्थ्यांना योग्य वाटचाल सुरू करण्यास मदत केली आहे.छोटस लावले रोपट्याचं आज महावृक्ष तयार होत ज्युनिअर कॉलेज ही सुरू केले आहे.
शाळेला आय एस ओ मानांकन प्राप्त असुन विद्यार्थ्यांना प्रश्न मंजुषा , बुद्धीमत्ता,नवोदय अशा परीक्षांचे उपक्रम सुरू असतात.
अमोल चवरे यांचा जन्म मुळातच शेतकरी कुटुंबात झाला, चिकाटी जिद्द बुद्धीमत्तेच्या जोरदार प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत घेत जावली हायस्कूल जावली माध्यमिक शिक्षण , मालोजीराजे विद्यालयात सायन्स शिक्षण घेऊन एम.एस.सी बीएड पूर्ण केले.अमोल चवरे यांचा जीवनपट उलगडून पाहिला तर प्रवास अतिशय खडतर मेहनतीने स्वप्न साकार करत आकाशाला गवसणी घालणारे यश मिळवले आहे.या यशस्वीतेसाठी परिश्रम करणाऱ्या शिक्षकाला राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने दि.७ रोजी सकाळी ११ वा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एक्सीड विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती व लातुर सायन्स अकॅडमी बारामती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार बद्दल राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शिक्षक, उपशिक्षिका , विद्यार्थ्यांचे पालक व जावली ग्रामस्थाच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
Back to top button
कॉपी करू नका.