(फलटण /प्रतिनिधी )- श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वावर, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत भांडवलकर वस्ती (शिवनगर) येथे एक भव्य मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर निकोप हॉस्पिटल फलटण यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ जिंती, चौधरवाडी (गारपीरवाडी), भांडवलकर वस्ती (शिवनगर), आणि शिंदेवाडी (पाटणेवाडी) या परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.
यावेळी निकोप हॉस्पिटल, फलटण येथील प्रसिद्ध डॉ. जे. टी. पोळ यांनी विशेषत्वाने उपस्थित राहून नागरिकांना विविध आरोग्यविषयक शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याविषयी माहिती दिली. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार ही करण्यात आले.न्यू हनुमान तरुण मंडळाच्या पुढाकाराने व अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
न्यू हनुमान तरुण मंडळाने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावेळी सर्व गावचे ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.