फलटण प्रतिनिधी – नुकताच जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोळकी जिल्हा परिषद गटामधून मोठ्या मताधिक्याने युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम हे निवडून आले. यामध्ये प्रामुख्याने सह्याद्री कदम यांचे होमपीच असणाऱ्या गिरवी गावांमधील लक्ष्मी वार्ड (निकाळजे वस्ती) येथील बुथवर एकूण ६९२ मतदान झाले. यामध्ये सह्याद्री कदम यांना ५४५ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जयकुमार शिंदे यांना १४७ मतदान झाले. तब्बल ५४५ मताची आघाडी युवा नेते सह्याद्री कदम यांना मिळाली.
यानंतर गिरवी येथील सिध्दार्थ तरूण मंडळाने त्याच्या अभिनंदनाचे होर्डिग्ज लावले आहेत. त्यावरील मजकूर बोलका आहे तो असा “लक्ष्मी वार्ड फक्त मतं देत नाही तर नेतृत्व घडवतो” या भागातील जनतेने कायम माजी आमदार चिमणराव कदम यांच्यावर भरभरून प्रेमच केले आहे. या बोलक्या मजकुराची चर्चा सध्या सर्वत्र फलटण तालुक्यात होताना दिसत आहे.
Back to top button