(फलटण /प्रतिनिधी) – गोवा येथे दि. २४ व २५ रोजी संपन्न झालेल्या डिस्ट्रीक्ट ३२३४ डी-१ च्या श्री संगम प्रांतीय परिषदेमध्ये द्वितीय उपप्रांतपाल पदासाठीच्या निवडणुकीत एमजेएफ लायन मंगेशभाई दोशी यांनी १३० मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा विक्रमी ४७ मतांनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला आहे.
गोवा येथील कलिंगुट बीचवर पार पडलेल्या डिस्ट्रीक्ट- ३२३४ डी-१ च्या प्रांतीय परिषदेमध्ये माजी प्रांतपाल एमजेएफ ला.प्रा. डॉ. राजेंद्र शहा, माजी प्रांतपाल पीएमजेएफ ला. भोजराज नाईक निंबाळकर, स्पॉन्सरिंग कमिटी चेअरमन ला.सुहास निकम, को-ऑर्डिनेटर ला.प्रसन्न कुलकर्णी, रिजन चेअरमन ला. निलम पाटील, तसेच लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष ला. महेश साळुंखे, सेक्रेटरी निखिल सोडमिसे, ट्रेझरर स्वप्निल सोडमिसे यांच्यासह ला.पूजा मंगेश दोशी, ला. रविकांत इंगवले, ला. शैलेंद्र शहा, ला. रणजित निंबाळकर, ला. प्रमोद जगताप, ला. दिलीप गुंदेचा, ला. अर्जुन घाडगे, ला. चंद्रकांत कदम, ला. डॉ. तुषार गायकवाड, ला. राजीव नाईक निंबाळकर, ला. विशाल शहा, ला. प्रमोद निंबाळकर, ला. दिलीप शिंदे, ला. विजय पाटील, ला. महेश गरवालिया, ला. बाळासाहेब यादव, ला. राजीव शहा, ला.स्विकार मेहता, ला. प्रविण निंबाळकर, ला. नितीन गांधी, ला. विनय गांधी, ला. सुशिल अग्रवाल, ला. राजेश आहुजा, लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा लायन संध्या गायकवाड, ला. उज्वला निंबाळकर, ला. सुनिता कदम, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा ला. ललिता ढवळे, ला. मंगल घाडगे, ला. संध्या फाळके, ला.सविता दोशी तसेच लायन्स क्लब वेलनेस वॉरिअर्सचे अध्यक्ष ला. सिद्धांत दोशी, ला. धिरेन शहा यांच्यासह प्रांतातील लायन क्लब्जचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना मंगेशभाई म्हणाले, “हे यश माझे एकट्याचे नसून, माझ्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येक ग्रासरुट लायन सदस्याचे आणि माझ्या परिवाराचे आहे. या निवडणूकीत मला पास्ट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर, प्रांतातील सर्व क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर, तसेच सर्व ग्रासरूट लायन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः लायन्स क्लब फलटण, लायन्स क्लब फलटण गोल्डन, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम आणि लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरिअर्सच्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हा विजय शक्य झाला, असे मंगेशभाई दोशी यांनी नमूद करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. यापुढील काळात पद भूषवणे यापेक्षा लायनिझमच्या माध्यमातून जनसेवा आणि प्रांतातील सर्व क्लबचे सक्षमीकरण यावर माझा पूर्ण भर असेल.” डिस्ट्रीक्टमधील प्रत्येक क्लब सेवाकार्यात अग्रेसर व्हावा आणि प्रत्येकाची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नम्रता आणि अखंड कार्यतत्परता यांचा संगम असलेल्या एमजेएफ लायन मंगेशजी दोशी गेली ३९ वर्षे लायनिझमच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा करणारे, पारदर्शक कार्यपद्धती आणि उत्कृष्ट प्रशासनाचा अनुभव असलेले उमदे नेतृत्व असून फलटण शहराची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समृद्ध असून आषाढी वारीदरम्यान आळंदीहून पंढरपूरकडे जाणार्या पालखी सोहळ्यात वारकर्यांची सेवा करण्याची परंपरा येथे जपली जाते. याच सेवाभावी संस्कारातून मंगेशभाई यांचे नेतृत्व घडले आहे.
मंगेशभाई यांनी १९८६ पासून लायनिझममधील प्रवास सुरू केला. ट्रेझरर, सेक्रेटरी, क्लब प्रेसिडेंट अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. माजी प्रांतपाल ला. डॉ. राजेंद्र शहा यांच्या कार्यकाळात डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी आणि ला.भोजराज नाईक निंबाळकर यांच्या कार्यकाळात डिस्ट्रिक्ट चीफ अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या दीर्घ सेवाकाळात अनेक प्रांतपालांचे मार्गदर्शन लाभले आणि एक सक्षम ग्रासरूट लायन म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
लायनिझमबरोबरच ते धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर, लायन्स अबॅकस सेंटरचे संस्थापक, फलटण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, अखिल भारतीय तीर्थरक्षा कमिटी सदस्य, कराड अर्बन बँकेचे सल्लागार, श्री चंद्रप्रभू जैन मंदिराचे ट्रस्टी, क्रेडाई सदस्य, फेडरेशन ऑफ हुम्मड जैन समाज सदस्य, श्रीमंत मालोजीराजे बँकेचे माजी संचालक, सातारा ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि जैन सोशल ग्रुप फलटणचे माजी अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा हा मंत्र घेऊन त्यांनी गेली अनेक दशके अखंडपणे सेवा केली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब पत्नी पूजा, मुलगा सिद्धांत आणि सून स्वराली हेही सेवाकार्यात सक्रिय सहभागी असून त्यांचे घरच एक ‘लायन्स परिवार’ बनले आहे.
आगामी कार्यकाळात त्यांनी काही महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामध्ये प्रांतातील सदस्य बळकटीकरणासाठी थेट संवाद, नवीन सदस्यांसाठी लीडरशिप वर्कशॉप, महिला सहभाग वाढविणे, युवकांसाठी कौशल्य विकास उपक्रम, मेगा हेल्थ कॅम्प, नेत्रदान व रक्तदानासाठी डिजिटल प्रणाली, ग्रीन डिस्ट्रिक्ट अभियान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्लबना मार्गदर्शन, तसेच ‘वन डिस्ट्रिक्ट — वन व्हिजन’ या संकल्पनेद्वारे एकात्मता वाढविणे यांचा समावेश आहे.या निवडीबद्दल नूतन द्वितीय उपप्रांतपाल एमजेएफ लायन मंगेश दोशी यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button