मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या एका संक्षिप्त शपथविधी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भिमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त हर्षकुमार निकम यांनी भिमनवार यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
भीमनवार यांची नियुक्ती ६ वर्षे किंवा त्यांच्या वयाच्या ६२ वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
एमपीएससीचे माजी अध्यक्ष रजनीश सेठ, कार्यवाहक अध्यक्ष डॉ. अभय वाघ, आयोगाचे सदस्य, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सरकारी अधिकारी आणि भिमनवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Back to top button