ताज्या घडामोडी
ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमचा ताल; फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह!

फलटण (प्रतिनिधी):फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल आणि लाठी-काठीच्या थरारक प्रात्यक्षिकांनी संपूर्ण फलटण शहर शिवमय झाले होते.






