फलटण प्रतिनिधि – फलटण तालुक्यामध्ये बेकायदेशीर रित्या माती व मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण तालुक्याच्या वतीने मंगेश आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या ते म्हणतात की बेकायदेशीर रित्या माती व मुरूम उत्खनन होत असल्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. तरी अशा वाहनांवर तहसीलदार यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनात देण्यात आली आहे.
निवेदनावर मंगेश आवळे, निलेश घोलप, रोहित अडागळे व आदित्य पाटोळे या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
Back to top button