आपला जिल्हा

शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे व संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रम

(फलटण / प्रतिनिधी):शिवसेना पक्षाचे राज्य सचिव संजयजी मोरे आणि सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी हे कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

वाढदिवसाचे औचित्य साधत समाजाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फळे व खाऊ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्यांना फळे व खाऊचे वाटप केले जाईल. यासोबतच विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आणि दिव्यांग मुलांसाठी कान-नाक-घसा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सकाळी ९.३० वाजता मूकबधिर विद्यालय, गोळेगाव ठाकूरकी (ता. फलटण) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाढदिवस साधेपणाने साजरा करत समाजोपयोगी कार्यातून जनसंपर्क वाढविण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button