आपला जिल्हा

फलटण येथे “फकिरीयत” चित्रपटाचे शानदार शुभारंभ; “क्रियायोग” भूषण पुरस्काराने माॅ रुद्रात्मिक गुरूमाई सन्मानित

(फलटण/ प्रतिनिधी)- देशभरात प्राचीन अध्यात्मिक अभ्यासावर आधारित असलेला फकिरीयत चित्रपटाचे मोठ्या दिमाखात फलटण दि.१डिसेबंर रोजी सिटी प्राईड चित्रपट गृहामध्ये प्रदशिर्त करण्यात आला.

” फकिरीयत” चित्रपट उदघाटन समारंभावेळी संत गुरुमाई यांचे फलटण तर्फे. डॉ गुळवणी, डॉ माधव पोळ, डॉ अलका पोळ, डॉ प्रसाद जोशी, डॉ किरणकुमार नाळे, डॉ राजश्री नाळे, ला. मंगेश दोषी, ला. पूजा दोशी, कैलास साळुंके, राकेश हेंद्रे, बाबाजी काळे,डॉ सुजित अडसूळ( बारामती) ऍड. योगेश वाघ( बारामती)यांचे कार्यक्रामा वेळी सत्कार करण्यात आले.

देशाभरात आध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या व समाज प्रबोधन करुन फलटण चित्रपट प्रेक्षागृहात प्रदशिर्त करण्यात आला या वेळी उपस्थित होते.चित्रपट समाप्ति नंतर हजारो प्रेक्षकांना त्यांनी कृपाशीर्वाद आणि दर्शन दिले. माँ गुरुमाई रुद्रात्मिका यांनी पत्रकार परिषदेत सर्वांना मार्गदर्शन केले. अनेकांचे आध्यात्मिक प्रश्नावर अत्यंत सुंदर भाष्य केले. अध्यात्म व क्रियायोग , ध्यान म्हणजे काय.?पाखंड म्हणजे काय.?तंत्र म्हणजे काय? हे क्रियायोग नेमके कसे करायचे, त्याने आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे होतात या सर्व विषयावर अतिशय सुंदर भाष्य केले. विशेषतः तरुणांना तरुणपणीच आध्यात्मिक मार्गावर येण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून आवाहन केले.
गेल्या दहा वर्षांमध्ये प्राचीन योगीक पद्धत क्रियायोगाच्या बॅचेस पूर्ण महाराष्ट्रभर आणि काशीमध्ये त्या घेतात, मार्गदर्शन करतात.क्रियायोग हे अत्यंत प्राचीन आहे. सर्वांगीण विकास करणारे ध्यान,प्राणायाम, मुद्रा यांचे संयोजन व प्राचीन आध्यत्मिक ज्ञान म्हणजे क्रियायोग!उत्तराखंड, द्वारहाट, कुकुचिना येथील गुफा आश्रम संकुल व रुद्रधाम,नाशिक याच्या त्या संस्थापक आहेत.
क्रियायोग मिशन फाउंडेशनचे ध्येय जगभरातील क्रियायोग शिकू इच्छिणाऱ्या आणि ध्यान करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी एक समकालीन अध्यात्मिक जागा निर्माण करणे हे आहे.अध्यात्मिक प्रशिक्षणामध्ये क्रियायोगचे बेसिक आणि ऍडव्हान्स दीक्षा अभ्यासक्रम कर्मक्षालन यज्ञ ब्रह्मखोज शिबिर, हिमालयीन साधना शिकविल्या जातात.ही सर्व शिबिरे नाममात्र शुल्कमध्ये आयोजित केली जातात.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button