ताज्या घडामोडी

मुधोजी महाविद्यालयात ३ जानेवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन : सिंगापूर व साऊथ कोरिया येथील वैज्ञानिकांचे संशोधनात्मक मार्गदर्शन*

फलटण: प्रतिनिधी :फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित आणि ‘नॅक’ ए+ मानांकन प्राप्त मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उदयोन्मुख क्षितिजे: शाश्वततेचा मार्ग’ (EHST-2026) या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचचे वैशिष्ट्य म्हणजे सिंगापूर व साऊथ कोरिया या प्रगत राष्ट्रातील नामवंत वैज्ञानिक व संशोधक या परिषदेसाठी उपस्थित राहणार असून त्यांच्या संशोधनात्मक मार्गदर्शनाचा लाभ सहभागी संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे फलटण सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील दृष्टिकोनाची थेट ओळख होणार आहे.
या परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होणार असून विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडी आणि पर्यावरण पूरक विकास नवसंशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
सदर परिषदेचेला फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
या परिषदेबाबत बोलताना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी सांगितले की ही परिषद फलटणच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे जास्तीत जास्त संशोधक व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या कुशल नेतृत्वाखाली या परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे हे या परिषदेचे सचिव म्हणून कामकाज पाहत आहेत. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी परिषदेचे निमंत्रक प्रा. डॉ. ए. पी. आचार्य आणि सहनिमंत्रक डॉ. एम. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाविद्यालयीन परिवार परिश्रम घेत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button