आपला जिल्हा
जावल सिद्धनाथ जन्मोत्सव निमित्ताने जावली ता फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
गेल्या ३६ वर्षीची परंपरा : पूर्ण सात दिवस मांसाहार बंद असतो


संध्याकाळी ह.भ.प भरत शास्त्री महाराज परभणी यांचे प्रवचन व किर्तन ,दि ७ रोजी प्रवचन व कीर्तन सुरेश नाळे , जावली,दि.८ रोजी राहुल महाराज फडतरे,दिघंची ,दि ९ रोजी अभिमन्यू महाराज कदम ,दहिगांव,दि १० रोजी संदीप महाराज गुरव, तीर्थक्षेत्र पाडळी, सातारा.दि ११ रोजी दादासो महाराज नरळे , म्हसवड दि.१२ रोजी शिवदत्त गलांडे महाराज जावली, दि १३ रोजी काल्याचे किर्तन निवृत्ती महाराज झागडे, आळंदी यांच्या किर्तन होणार असून, जावली ता फलटण येथील सलग ३६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असुन कालावधी मध्ये संपूर्ण गावातील नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात येते,या वेळी पूर्ण सात दिवस गावातील ग्रामस्थ मांसाहार बंद असतो. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असुन मोठ्या उत्साहाने सप्ता साजरा केला जातो. अशी माहिती सप्ता समितीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.