(फलटण/प्रतिनिधी):- फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३४५/२०२५ या गुन्हयातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने, पोलीस उपनिरीक्षक (निलंबीत) याने पोलीस दलाचे पुर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केली. पोलीस उप निरीक्षक पदास अशोभनिय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच नमुद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.
त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक व लोकहिताचे दृष्टीकोनातुन उचित होणार नाही. म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने नेम. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, सातारा यास मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये दिनांक ०४/११/२०२५ रोजीपासून “शासकिय सेवेतून बडतर्फ केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.