फलटण: आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण नगर परिषदेची निवडणूक सन – २०२५ नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.
या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राजे गटाच्या वतीने देण्यात आली आहे. सदरच्या मुलाखती स्थळ – “गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” कोळकी, ता.फलटण येथे होणार आहेत.
उद्या गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर- २०२५ सकाळी प्रभाग क्रमांक -१ वेळ १० ते ११ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक- २ वेळ ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक-३ वेळ १२ ते १ वाजेपर्यंत सायंकाळी ठिक ६ वा. प्रभाग क्रमांक ४ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ५ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक-६ वेळ ७ ते ८ वाजेपर्यंत
शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक – ७ वेळ १० ते ११ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक- ८ वेळ ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – ९ वेळ १२ ते १ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – १० वेळ १ ते २ वाजेपर्यंत सायंकाळी प्रभाग क्रमांक- ११ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – १२ वेळ ७ ते ८ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक १३ वेळ ८ ते ९ वाजेपर्यंत असा मुलाखतीचा कार्यक्रम राहणार आहे.
तरी राजे गटाच्या इच्छुक सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह सदर मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन यावेळी राजेगटाच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.