ताज्या घडामोडी

फलटण नगरपरिषद निवडणूक सर्वर डाऊन झाल्यामुळे एक सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही – सचिन सुर्यवंशी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १दिवसाची मुदतवाढ मिळणार काय

फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानूसार दि. १०/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ सकाळी ११ ते ३ या वेळेत भरायचे आहेत. परंतु आजचा दिवस सर्व्हर डाऊन असल्या कारणाने अनेक लोकांना अर्ज दाखल करता आलेला नाही या प्रशासनाच्या चुकी मुळे एक दिवस कमी झाला यावर मुदत वाढ देणार का असा सवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सुर्यवंशी यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, मतदार
कारण यादी दुरुस्तीच्या कामाचा निव्वळ शो केल्या कारणानें आज ही मतदार याद्या मध्ये अनेक चुका आहेतच प्रामुख्याने फलटणचे
नायब तहसीलदार सोनवणे साहे यांच्या पत्नीचेच नाव चुकीचे छापले गेले आहे. तर सर्व सामान्य मतदार यांचे काय असू शकेल याचा विचार न केलेला बरा असा खोचक सवाल हि सुर्यवंशी यांनी केला आहे. पण व्यक्ती परिचित असेल आणि यादीत नाव चुकीचे असेल तर त्या मतदारांवर घेतलेली हरकत ग्राह्य धरली जाणार का मतदान करू दिले जाणार का (आधार कार्ड/मतदान ओळख पत्र यावरील नाव) आणि मतदार यादीतील नावात समानता नसेल तर.यादी दुरुस्तीची तारीख संपलेली आहे.आता एखादे नाव बदलले तर तो गुन्हा कोणावर दाखल होणार त्याची माहिती हि देण्यात यावी असे हि शेवटी सुर्यवंशी म्हणाले आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button