फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा :
आगामी फलटण नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचे सर्वेसर्वा विशाल पवार यांनी नुकतीच राजे गटा कडून प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी मागणी केली आहे.
विशाल पवार यांच्या नावाची संपूर्ण प्रभागांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या नावाला सर्व प्रभागातून पसंती मिळताना दिसत आहे.
विशाल पवार हे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात ते राजे गटाचे कट्टर समर्थक असून त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या व गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे केल्यामुळे तसेच ते सुसंस्कृत सर्वांनाच मिळून मिसळून वागणारे व सर्वसमावेशक असे युवा नेतृत्व आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. या पदाच्या माध्यमातून गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शन सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबिरे तसेच युवकांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले असून त्यांनी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम राबविले आहेत या सर्व कामामुळे त्यांच्या नावाला प्रभाग क्रमांक १० मधून मोठी पसंती मिळताना दिसून येत आहे.
Back to top button