(जावली/अजिंक्य आढाव)- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कुलदैवत श्रीक्षेत्र जावल सिद्धनाथ चरणी अर्थव भोईटे व कुटुंबियांनी नवसाला पावणारा हाकेला धावणारा श्री सिद्धनाथ साहेब महाराज यांना रामदास भोईटे यांनी आपला मुलगा अर्थव सैन्य दलात भरती व्हावा असा नवस केला होता. मुळचे हिंगणगाव ता फलटण येथील कुटुंबीय अमावस्या, पौर्णिमा,यात्रेला नेहमी येत असतात अशातच आपले शिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्य दलात भरती व्हावा व देश सेवा मुलांच्या हातुन घडावी या करत सिद्धनाथ चरणी नवस केला होता.
हिंगणगाव येथील अर्थव भोईटे भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने दिपावलीच्या निमित्ताने व अर्थव भोईटे यांच्या वजना एवढे तब्बल ६५ किलो पेढे, हिंगणगाव परिसरात व जावलीतील सिद्धनाथ मंदिरासमोर भोईटे कुटुंबियांनी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना पेढे वाटून आपला नवस पुर्ण केला.
Back to top button