ताज्या घडामोडी

“पराभव सुत्ता” तून यशस्वी जीवनाचे मार्गदर्शन मिळते – सोमीनाथ घोरपडे

(फलटण /प्रतिनिधी): यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी कोणते दुर्गुण टाळावे आणि कोणत्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, यावर मार्गदर्शन करणारे ‘पराभव सुत्त’ प्रवचन फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथे झाले. भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेच्यामार्फत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प गुंपताना ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी हे प्रतिपादन केले.

​या प्रवचनात सोमीनाथ घोरपडे यांनी ‘पराभव सुत्त’ यामध्ये तथागत भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या संघारामात राहत होतें तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करुन भगवंताजवळ आली व भगवताला नमस्कार करुन एका बाजूला उभी राहिली. बाजूला उभी राहून ती व्यक्ती भगवंताला पद्यात म्हणाली- आम्ही भगवान गौतमाला विचारण्यासाठी आलो आहोत की पराभव पावणारा पुरुष कोणता? भगवान बुद्धांनी शिष्यांना मानवी जीवनात अधोगतीला नेणाऱ्या १२ प्रमुख कारणांबद्दल मार्गदर्शन केले. या १२ कारणांमध्ये धम्माचा द्वेष करणे, दुर्जनांची संगत करणे, आळशीपणा आणि क्रोध, वृद्ध आई-वडिलांची सेवा न करणे, गरजूंची फसवणूक करणे, स्वतःच सर्व सुख उपभोगणे, अहंकार आणि जातीचा गर्व, व्यसनाधीनता, परस्त्रीगमन, वयोवृद्ध असूनही तरुण स्त्रीशी विवाह करणे, दुर्व्यसनी व्यक्तींना महत्त्वाचे अधिकार देणे आणि अवाजवी हाव बाळगणे यांचा समावेश होतो, असे घोरपडे यांनी सांगितले.

या वेळी बोलताना घोरपडे म्हणाले, “बुद्धांनी सांगितलेली ही १२ कारणे आजही तेवढीच लागू आहेत. जो माणूस या दुर्गुणांपासून दूर राहून सत्कर्म करतो, तो जीवनात कधीही पराभूत होत नाही.” त्यांनी ‘पराभव सुत्त’मधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगताना, आजच्या काळात या शिकवणीचा उपयोग कसा करता येईल, यावरही मार्गदर्शन केले.

यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ कुरवली खुर्द गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आला. त्यासोबत उपस्थितांना तालुका शाखेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे व संस्कार विभागामार्फत सूत्रपठन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी भाद्रपद पौर्णिमे धम्मामध्ये असणारे महत्व सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रचार व पर्यटन विभागाचे तालुका शाखेचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे व बजीरंग गायकवाड यांनी केले.

​या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप,कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार विभागाचे तालुक्याचे उपाध्यक्ष बजीरंग गायकवाड, तालुका संघटक विजय जगताप, जेष्ठ मार्गदर्शक, गायक लक्ष्मण निकाळजे, धम्मप्रसारक संघराज निकाळजे पदाधिकारी आणि गावातील अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते. या प्रवचनामुळे उपस्थितांना जीवनातील योग्य मार्ग निवडण्यास मदत मिळाली, असे अनेकांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रवचनांमुळे समाजात बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार होण्यास मदत होते, असे आयोजकांनी सांगितले.यावेळी संघराज निकाळजे यांच्या कुटुंबीयांनी खीर दान केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.