फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनने एका प्रशंसनीय मोहिमेअंतर्गत चालू वर्षांमध्ये चोरीला गेलेले तब्बल १२ लाख ७० हजार रुपये किमतीचे ७४ मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात यश मिळविले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली आहे.
चोरीला गेलेले मोबाईल केवळ महाराष्ट्रातच वापरले जात नव्हते तर कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये या मोबाईलचा वापर होत असल्याने त्याचा शोध घेऊन हे मोबाईल हस्तगत करण्यात फलटण तालुका पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या टीमला हे यश मिळाले असल्यामुळे त्यांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी या कामे सी. ई. आय. आर. पोर्टल या माहितीच्या आधारे सदर मोबाईलचा शोध सुरू केला होता तपासामध्ये अनेक मोबाईल राज्याच्या बाहेर परजिल्ह्यात त्याचा वापर होत असल्याचे आढळून आले. ज्या व्यक्तीकडे या मोबाईलचा वापर होत होता त्यांच्याकडे पोलिसांनी संपर्क साधून त्यांना सदरचा मोबाईल हा चोरीचा असल्याचे सांगून तो मोबाईल परत मिळविण्यात यश मिळवले. सदरचे मोबाईल हे जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत चोरीला गेली होते.
सदर चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकाला परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांच्या मध्ये समाधानाची भावना आहे.
यासंदर्भात फलटण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदरची मोहीम पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, पोलीस उपाधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने पोलीस उपनिरीक्षक बदने, पोलीस हवलदार नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे आणि हनुमंत दडस यांचा समावेश होता.
Back to top button
कॉपी करू नका.