(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण तालुक्यातील सरडे गावातील शेतकऱ्याच्या दि.३१/९रोजी पहाटे ३ शेळ्या चोरी झाल्या बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.त्या अनुषंगाने गोपीनीय माहितीच्या आधारे एक अल्पवयीन आरोपी सोबत नितीन जयवंत जाधव रा दालवडी ता. फलटण याला ताब्यात घेतले असता तपासात सदर गुन्हा हा २ साथीदारा सोबत केल्याचे केल्याची कबुली दिली. यातील इतर २ आरोपी फरार असून सदर गुन्हायातील चोरीस गेलेल्या ६० हजार किंमतीच्या एकुण ३ उस्मानाबाद जातीच्या शेळ्या मिळुन आल्या असून फलटण तालुक्यातील व परिसरातील कोणाच्या असल्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले असून पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी तुषार दोशी सातारा पोलीस अधीक्षक, वैशाली कडुकर सो अप्पर पोलीस अधीक्षक पोलिस उपनिरीक्षक भालचीम यांच्या सुचनानुसार सुनील महाडिक पोलिस निरीक्षक , यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक जी.बी मदने, पोलिस हवालदार नितीन चतुरे, श्रीनाथ कदम , अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी तपासात सहभागी झाले होते पुढील तपास पोलीस हवालदार ओबांसे करीत.
Back to top button
कॉपी करू नका.