क्राईम

फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई ; तडीपार असलेल्या फलटण हद्दीत आढळून आलेल्या गुन्हेगारांवर कारवाई

(जावली/ अजिंक्य आढाव)दि. 30 जुलै 2025 रोजी मा.पोलिस अधीक्षक सो सातारा यांनी जिल्ह्यात “कोबींग ऑपरेशन “राबविण्याबाबत होते पाहिजेत फरारी ,आरोपी तडीपार, माहितगार गुन्हेगार तपासण्याचे काम करण्यासाठी पोलिस ठाण्यातील एकूण तीन टीम तयार करण्यात आल्या होत्या त्यातील पहाटे 2 वाजता दरम्यान सरडे मध्ये गेले असता त्यांना त्या गावातील तडीपार केलेले 1) रोहित भिमराव जाधव, वय 32(2) ऋतिक दत्तात्रय जाधव वय – 23(3) विशाल बाळासो जाधव वय- 23(4)सुरज शिवाजी बोडरे वय – 27 सर्व राहणार सरडे ता फलटण जि सातारा यांना पोलिसांंची चाहूल लागताच पळून जाऊ लागले असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.

सदर इसमाना फेब्रुवारी सन 2025 मधे दोन वर्षे करीता सातारा व पुणे जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले होते.तरीही ते हद्दपार आदेशाचा भंग करून अनाधिकृत वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या सुचनेनुसार सुनील महाडिक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाचे जी.बी.बदने – पोसील उपनिरीक्षक ,पो.हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम पो.कॅ.हनुमंत दडस ,मपोकाॅ. अरुंधती कर्ण यांनी या कारवाईमध्ये सहभाग झाले होते, पुढील तपास पोलीस हवालदार जगदाळे करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.