(फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा): शनिनगर फलटण येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पतंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नितीन निंबाळकर तर द्वितीय क्रमांक नरेश पालकर, तृतीय क्रमांक यशराज निंबाळकर, चतुर्थ क्रमांक शुभम बाबर यांनी पटकावला एकूण ५५ स्पर्धकांनी भाग घेतला होता.प्रारंभी सकाळी ९ वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर यांच्या शुभहस्ते स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी नगरसेवक पै. सलीम भाई शेख, माजी नगरसेवक किशोरसिंह ना. निंबाळकर, माजी नगरसेवक किशोर गुड्डू पवार, भाऊसाहेब कापसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी चंद्रकांत पवार, योगेश शिंदे व अमोल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विजेत्या प्रथम क्रमांकाला ४ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकाला ३ हजार रुपये चिन्ह, तृतीय क्रमांकाला २ हजार व स्मृतिचिन्ह, चतुर्थ क्रमांकाला १ हजार स्मृती चिन्ह देण्यात आली.
या स्पर्धेचे आयोजक पै. पप्पू शेख यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार केला.
तर या स्पर्धा पार पाडण्यासाठी पै. पप्पू शेख, संजय कापसे, दत्ता जाधव, हर्षद शेख, जावेद डांगे, जफर आतार, रोहिदास पवार, वसीम शेख, अनिल वाडकर, नरेश पालकर, अरुण आंबोले,गोटया राऊत, जावेद उर्फ सोन्या शेख, सनी पवार, नीती केश राऊत, नाईद शेख, इब्राहिम शेख, मोबेन शेख व रिजवान शेख, नंदू चवडके, बंटी हाडके साजिद डांगे, सोहेल डांगे, श्रीकांत पालकर, अबताब मणेर, अखिल डांगे, जनुद्दीन जहारी, गणेश कर्वे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
कॉपी करू नका.