आपला जिल्हा

नगरसेविका कु.सिध्दाली शहा यांचा तडकाफडकी राजीनामा ? ; समिती निवडीत नाराजी नाट्य दिसून आल्याचे स्पष्ट..!

(फलटण/ प्रतिनिधी)- आज फलटण नगरपरिषद विविध समित्यांची सभापती निवडणूका बिनविरोध पार पडल्या. समितीच्या सभापती पदावरून आज सत्तारूड गटांमध्ये नाराजी नाट्य दिसून आले.

फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी रणजीतसिह भोसले या समिती सभापतीच्या निवडणुकीत गैरहजर राहिल्याचे आढळून आले.

तसेच कुमारी सिद्धाली शहा या माजी जेष्ठ नगरसेवक अनुप शहा यांच्या कन्या असून त्यांना समितीचे सभापती हवे होते असे समजते मात्र समितीचे सभापतीपद न देता समितीचे सदस्य म्हणून घेण्यात आले होते. मात्र त्यांनी त्या समितीच्या सदस्यत्व पदाचा तात्काळ राजीनामा दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

तसेच उपनगराध्यक्ष सौ.प्रियदर्शनी भोसले यांना देखील दुय्यम दर्जाची समजली जाणारी व ज्या समितीला काहीच काम नाही अशा शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद दिले असल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि या नाराजी मुळेच त्या समितीच्या सभापती निवडी वेळी गैरहजर राहिल्याचे दिसून आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button