(फलटण /प्रतिनिधी) : शंकर मार्केट येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या हिरणवळे बंधूंची फलटण तालुक्याचे युवा शिवसेना नेते तथा फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली तसेच उपस्थित डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली. हिरणवळे कुटुंबियांना धीर देताना ते म्हणाले, “या कठीण प्रसंगी खचून जाऊ नका. आम्ही हिरणवळे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
त्यांच्या या भेटीमुळे कुटुंबियांना मानसिक आधार मिळाला असून परिसरातही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Back to top button