आपला जिल्हा

विज बिल भरणा करणाऱ्या रकमेवर एका ज्येष्ठ नगरसेवकांने मागितली टक्केवारी अनुप शहा यांचा आरोप

शंकर मार्केट येथील दवाखान्याचे वीज कनेक्शन तोडले:फलटण नगर परिषदेने वीज बिल न भरल्यामुळे नामुष्की - अनुप शहा

(फलटण /प्रतिनिधी)फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून शंकर मार्केट फलटण येथे सुरू असलेला दवाखान्याचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. सदरची कारवाई वीज वितरण कंपनीने नगर परिषदेने विज बिल न भरल्यामुळे केली आहे. ही फलटण नगरपरिषदेची बाब निश्चितच शरमेची असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली आहे.

निवेदनात पुढे अनुप शहा म्हणतात की,
नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा आहे. विज बिल भरण्यासाठीच्या रकमेवर एका ज्येष्ठ नगरसेवकाने त्यामध्ये किती मलिदा मिळू शकतो अशी विचारणा केली असल्याने त्यावर मिळणारी टक्केवारी दिली तरच हे बिल भरले जाईल अशी भूमिका घेतल्याने वेळेत बिल भरणा करता आला नाही. म्हणून फलटण शहरातील नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक इमारतींचे देखील लाईट बिल थकल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात आले असून वीज बिलावर जर टक्केवारीची अपेक्षा केली जात असेल तर आता ही नगरपालिका रामाच्या हातात नाही आणि आता रणजीत दादांच्याही हातात राहिली नाही काय असा प्रश्न अनुप शहा यांनी उपस्थित केला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button