(फलटण/ प्रतिनिधी )- फलटण शहरामध्ये सध्या दररोज काही ना काहीतरी अनुचित प्रकार घडताना दिसून येत आहे. कधी नव्हते एवढे अनुचित प्रकार सध्या शहरात घडताना दिसत आहेत नेमकी फलटण शहराची शिस्त बिघडतेय कुठे त्याना राजकिय वरदहस्त मिळतोय कि, भुरट्या प्रवृत्तीच्या मुलांच्यावर पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही. यामुळेच तर शहरातील वाढत्या बेकायदेशीर धंद्यांप्रकरणी आता पोलिस प्रशासनावरच गंभीर आरोप होत आहेत. काही स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्यामागे पोलिसांकडून कथित ‘हप्ते’ स्वीकारले जात असल्याची चर्चा आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठिकाणी छापे टाकले जात नाहीत किंवा कारवाई अर्धवट राहते. त्यामुळे बेकायदेशीर धंदे उघडपणे सुरू राहतात आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना अभय मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
त्यातून असे प्रकार घडताना दिसत आहे.
कालच्या प्रकरणानंतर आज देखील फलटण शहरातील एका तरुणाने फलटण नगर परिषदेच्या एका महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.
तरीदेखील त्याच्यावर कोणतेही प्रकारचे कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. फलटणचा बिहार तर होणार नाही ना आता प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित व्यक्ती हा नगरपरिषदेमध्ये कामानिमित्त आला असताना त्याने एका महिला अर्वाच्य भाषेत बोलून तसेच शिवीगाळ करण्यात आली. संबंधित महिला कर्मचाऱ्यास सत्ताधारी पक्षातील दोन नगरसेवकांनी दबाव आणून कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले तसेच संबंधित ज्या व्यक्तीने महिलेला शिवीगाळ केली त्याच्याकडून फक्त माफीनामा लिहून घेतला. परंतु हा प्रकार निंदनीय असून अशा प्रकारे जर फलटण नगर परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांना अशी शिवीगाळ दमदाटी होत असेल तर सत्तारूढ पक्षाचे लोक प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्याधिकारी हे स्वतःला खूप सरळ मार्गे व कायद्याची भाषा इतरांना शिकवित असतात व कायद्यावर बोट ठेवून आतापर्यंत काम करत आलेले असून आपल्याच महिला कर्मचाऱ्याला जर अशा प्रकारे शिवीगाळे दमदाटी होत असेल तर मुख्याधिकारी संबंधित व्यक्ती विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Back to top button