फलटण प्रतिनिधी- काल फलटण शहरातील शंकर मार्केट येथील तरुणांवर काही किरकोळ कारणावरून दहा-बारा युवकांनी धारदार शस्त्राने तसेच लोखंडी रॉड च्या साह्याने खुनी हल्ला केल्यामुळे सदरच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये घबराट निर्माण झाली आहे.
या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ फलटण येथील लाईफ लाईफ येते रात्री हलविण्यात आले आहे.
या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी ठीक १०.३० वाजता शंकर मार्केट मंडई येथे सर्वपक्षीय युवकांच्या वतीने निषेध नोंदविला जाणार आहे.
तरी या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी जुन्या गावठाण फलटण परिसरातील व मंडई परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काही युवक मित्रानी केले आहे.
Back to top button