आपला जिल्हा

शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न..!

श्रीमंत संजीवराजे यांनी संजयजी मोरे व शरदजी कणसे यांना दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!

(फलटण/ प्रतिनिधी) – शिवसेनेचे राज्य सचिव संजयजी मोरे व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये प्रामुख्याने सकाळी ७ वा. तेली गल्ली येथील श्री. शंभू महादेवाला दुग्धाअभिषेक करण्यात आला याप्रसंगी सातारा जिल्हा समन्वयक विराज खराडे, फलटण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक विशाल तेली, विजय मायने यांच्या शुभहस्ते हा अभिषेक करण्यात आला.


सकाळी ठीक ९ .३० वाजता फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केळी, सफरचंद व बिस्किट पुड्यांचे वाटप फलटण शहर शिवसेनाप्रमुख निलेश तेलखडे तालुकाप्रमुख पिंटू ईवरे, शिवसेना नेते ज्ञानेश्वर पवार, महिला आघाडी प्रमुख नंदिनी गायकवाड, पांडुरंग अहिवळे, शक्ती भोसले, विकी काकडे, इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.


तर कुरवली येथील ओंकार वृद्धाश्रम येथील वृद्धांना देखील केळी, सफरचंद व बिस्कीट पुढे , आम्रखंड यांचे वाटप सातारा जिल्हा ॲम्युच्युअर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक विकास काकडे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुधीर अहिवळे, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. स्मिता शहा, नगरसेविका सौ. सारिका मदने इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यानंतर महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील खाऊचे वाटप किशोर तारळकर, अमरसिंह खानविलकर, सिकंदर डांगे व बाबुराव जाधव, यश शिंदे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शेवटी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम व दिव्यांग मुलांची कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न करण्यात आले.

यावेळी फलटण येथील प्रसिद्ध कान, नाक व घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी मूकबधिर विद्यालयातील ४० मुलांची मोफत कान, नाक व घसा तपासणी केली.

वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे राज्य सचिव संजयजी मोरे व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार दादासाहेब चोरमले यांनी मानले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button