फलटण – दुधेबावी ता. फलटण येथील सुपुत्र,जि. प. केंद्रशाळा राजाळे येथील पदवीधर शिक्षक शशिकांत पांडुरंग सोनवलकर यांना सातारा जिल्हा परिषदेचा २०२५-२६ या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे.
5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) यांचा वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार शशिकांत सोनवलकर यांना मिळाला आहे.
सध्या ते राजाळे जिल्हा परिषद शाळेवरती पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या अगोदरची जिल्हा परिषद मिरढे शाळेवरती त्यांनी विविध नवोपक्रम राबवले असून, क्रीडा विभागामध्ये जिल्ह्याची जनरल चॅम्पियनशिप मिळवन्यात
त्यांचा सिहाचा वाटा आहे. सध्याच्या राजाळे शाळेतही सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग शैक्षणिक नवोपक्रमासह, विविध शालेय उपक्रम राबवत आहेत. त्यांनी मेढा, एकीव ता. जावली, जावली ता. फलटण, पवारवाडी (आसू), सासकल, फिरंगाईवस्ती, धनगरवाडी (हिंगणगाव) याही गावामध्ये शिक्षक म्हणून यशस्वी कार्य केल्याचे तेथील पालक व ग्रामस्थानी सांगितले. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 25 वर्ष संत गाडगेबाबा व्याख्यानमाला आयोजित करून समाज प्रबोधन करत आहेत.ते प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या कामाचा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवन्यात यशस्वी ठरून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ,शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा गायकवाड,चनय्या मठपती, दारासिंग निकाळजे, बन्याबा पारसे,अलका माने,केंद्रप्रमुख बबनराव निकाळजे, मुख्याध्यापिका छाया भोसले, शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे आजी माजी पदाधिकारी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांसह अनेकांनी अभिनंदन केले.
Back to top button
कॉपी करू नका.