ताज्या घडामोडी

फलटण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शाळांची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

(फलटण/ प्रतिनिधी ): जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण (DIET) द्वारे दर महिन्याला शिक्षण परिषदा आयोजित केल्या जातात. शिक्षण परिषदांचे उद्देश शिक्षकांची व्यावसायिक वाढ करणे. शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणे, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञान याबाबत अद्ययावत माहिती देणे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना करणे. शासनाच्या नवीन अभ्यासक्रमाची आणि शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे.

या परिषदांमध्ये केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षक सहभागी होतात. येथे शैक्षणिक समस्यांवर चर्चा केली जाते, नवीन कल्पनांची देवाणघेवाण होते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृती आराखडा तयार केला जातो.यावेळी फलटण नगर परिषद कार्यक्षेत्रातील नगर परिषद व सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची मुधोजी हायस्कूल व जूनियर कॉलेज फलटण येथे दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या शिक्षण परिषदेत शाळा स्तरावर राबवण्यात येणारे विशेष उल्लेखनीय उपक्रम यावर कमला निंबकर बालभवन च्या डॉ. इरावती कर्वे ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री. प्रदीप ढेकळे यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी ‘मेंढक बोला टर टर’ या गाण्याने शिक्षकांचा सहभाग घेऊन मार्गदर्शनाची सुरवात केली.

’वाचन’ उपक्रमात शब्द लपवणे हा उपक्रम घेतला. यासाठी ‘डुंगी डान्स’ हे पुस्तक निवडले. सुरवातीला प्रकट वाचन घेऊन गोष्ट वाचून दाखवली. त्यानंतर त्या गोष्टीतील गाणे एक पाय वर एक पाय खाली, गोल गोल, ढिंच्याक ढिंच्याक, ढम ढम हे गाणे शिक्षकांना म्हणायला लावले. डोळे बंद करून वाचलेली गोष्ट आठवायला सांगितली. त्यानंतर या गोष्टीत लपवलेले शब्द ओळखायला सांगितले. त्यानी यात चांगला सहभाग घेतला.त्यांनी यावेळी ग्रंथालयाचा आणखी एक उपक्रम घेतला. तो म्हणजे ‘कवितेला क्रम लावणे ‘ यासाठी विंदा करंदीकरांची ‘चढवा चढवी’ ही कविता निवडली. कवितेला काय काय असते यावरून चर्चेला सुरवात केली.उदा.कवितेला नाव असते.यमक जुळवलेला असतो,कवितेला अर्थ असतो. अशी वेगवेगळी उत्तरे शिक्षकांनी दिली. त्यांनी कवितेला क्रम लावण्याचा छान प्रयत्न केला. त्यांनी क्रम लावलेल्या कवितेचे सादरीकरण घेतले.

यावेळी NAS गुणांकन वाढवण्यासाठी शाळा स्तर उपक्रम यावर श्री.रुपेश शिंदे, मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर फलटण यांनी मार्गदर्शन केले. नवोपक्रम व कृती संशोधन यावर मुधोजी हायस्कूलचे शिक्षक श्री.चंदन कर्वे यांनी मार्गदर्शन केले. इन्स्पायर अवार्ड नॉमिनेशन यावर स्व.हणमंतराव पवार हायस्कूलच्या सौ.अमृता सागर निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती वर आधारित मासिक नियोजन(गणित,वाचन व लेखन)आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे अभिजित चांगण यांनी मार्गदर्शन केले.पालक सभा त्रैमासिक अहवाल यावर श्रीराम विद्याभवनच्या सौ.हेमलता गुंजवटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्रीम. दमयंती कुंभार यांनी उपस्थित सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये शिक्षण परिषदेतील विषयाला अनुरूप गुणवत्ता वाढीसाठी काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी कमला निंबकर बालभवन च्या डॉक्टर इरावती कर्वे ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रदीप ढेकळे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती फलटण तथा प्रशासन अधिकारी फलटण नगर परिषद श्री. अनिल सकपाळ सो, विषय साधन व्यक्ती श्रीम. दमयंती कुंभार, मॅडम समूह साधन केंद्र पंचायत समिती,फलटण, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री.लक्ष्मण शेडगे सर, केंद्र समन्वयक श्री.दीपक पवार सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थिती होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.