आपला जिल्हा

जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे अपघाती निधन

(जावली /अजिंक्य आढाव)- फलटण तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक दैनिक ऐक्याचे जेष्ठ पत्रकार सामाजिक विचारवंत राजेंद्र भागवत (वय ५८)यांचे अपघाती निधन झाले.

 गोखळी तालुका फलटण सारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन त्यांनी अनेक चळवळीमध्ये भाग घेतला होता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता माजी आमदार कैलासवासी चिमणराव कदम यांचे ते कट्टर समर्थक होते.

पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. अनेक जनतेचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून ते सोडविले होते. फलटण ग्रामीण पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष होते.आज सकाळी नातीला सोडण्यासाठी ते मोटार सायकलवरून शारदानगर (माळेगाव ) येथे जात असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, ३ विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. दोन मुले पोलीस खात्यात असून १ मुलगा फलटण एसटी आगारात वाहक आहे.त्यांच्यावर दुपार नंतर गोखळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.