फलटण प्रतिनिधी – संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लावून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यामध्ये राज्य सरकारला जीआर काढून त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले यावेळी या मुंबईच्या आझाद मैदानावरील लढ्यात फलटण मराठा सेवक हजारोंच्या संख्येने तब्बल पाच दिवस आझाद मैदानावर तळ ठोकून होते.
यावेळी मराठा आरक्षण उप समितीचे प्रमुख नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या व एकच जल्लोष केला दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये येऊन या मराठा सेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करीत फलटणमध्ये पेढे वाटले.
फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा यांनी गावोगावी जाऊन मराठा समाजाची एकी निर्माण केली या एकीनंतर समाजाचे ऐक्य झोप असेल विविध प्रश्नांचे सोडवणूक केली, तसेच मराठा समाजातील विविध अडचणी सोडवून प्रत्येकाला मराठा आरक्षण कशासाठी व का पाहिजे याबाबत जनजागृती करून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी आपला फलटण तालुका उभा करण्यासाठी गेली अनेक वर्ष तन मन धनाने प्रयत्न केले. या प्रयत्नातून फलटण तालुक्यातील गाव तिथे मराठा क्रांती मोर्चा शाखा ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवली ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या फलटण तालुक्याची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली.
दरम्यान संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील लाखो मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा या शाखेच्या माध्यमातून एकवटला यामुळे अंतरवाली सराटी येथील आंदोलन असो किंवा यापूर्वी झालेले नवी मुंबई येथील आंदोलन असो किंवा आत्ताचे आझाद मैदानावरील आंदोलन असो यामध्ये हजारो मराठा मावळे फलटण तालुक्यातील मुंबईला गेले होते या ऐतिहासिक लढ्यात सहभागी होऊन हा ऐतिहासिक लढा जिंकल्यानंतर पहाटे फलटणला आले यानंतर आज बुधवार दिनांक 3 रोजी सकाळी 11 वाजता शेकडून ज्या संख्येने जमा होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले व फलटण शहरामध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व मराठा सेवक तसेच अखंड मराठा समाजातील लोक उपस्थित होते.
फलटण – मराठा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात आल्या यामुळे मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने पेढे वाटप करताना मराठा सेवक
Back to top button
कॉपी करू नका.