आपला जिल्हा
फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी” गणराय अवॉर्ड” स्पर्धा- नानासो उर्फ पिंटू इवरे

(जावली/ अजिंक्य आढाव)- हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आर्शीवादाने व शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतुन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.शंभुराजे देसाई साहेब यांच्या संकल्पनेतुन सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी पासुन फलटण शहर व व ग्रामीण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी गणराया एवढा स्पर्धा सुरू करत असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू उर्फ नानासो इवरे यांनी सांगितले .
गणेशोत्सव मंडळ यांना सामाजिक बांधिलकीतून प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे या गणरायावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त मंडळानी सहभागी होवुन गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन नानासो उर्फ पिंटुशेठ इवरे,फलटण तालुका शिवसेना प्रमुख यांनी केले आहे.
फलटण तालुका शिवसेना आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी भव्य गणराय अवॉर्ड २०२५
फलटण शहर/तालुका
गणराया अर्वाड २०२५
१आकर्षक मुर्ती व सजावट
२) आकर्षक देखावे:- (१)पौराणीक देखावा, २)देशभक्ती देखावा,३) सामाजीक संदेश देखावा, ४)पर्यावरण संदेश देखावा)
3) उत्कुष्ठ मिरवणुक
प्रत्येक विभाग
प्रथम क्रमांक सन्मान चिन्ह व ७००१/-रोख
द्वितीय क्रमांक सन्मान चिन्ह व ५००१/- रोख
तृतीय क्रमांक सन्मान चिन्हव ३००१/- रोख
सहभागी सर्व मंडळास सन्मान चिन्ह