(जावली/ अजिंक्य आढाव)- जावली ता.फलटण येथील राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली येथील विद्यार्थ्यांनी लांब उडी, गोळा फेक,१०० मीटर धावणे या मैदानी खेळांमध्ये घवघवीत यश संपादन केले.ही स्पर्धा फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने दि.२४ रोजी फलटण मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होती.
राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली चे यश मिळविलेले विद्यार्थी
या स्पर्धेत उत्कृष्ट प्रविण मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – आदित्य कैलास चवरे (वयोगट १६- लांब उडी ) प्रथम क्रमांक पटकावला, शिवानी कृष्णात आटोळे (वयोगट – १८ लांब उडी ) द्वितीय क्रमांक मिळाला, अमृता गणेश लंगुटे (वयोगट-१२ गोळा फेक) द्वितीय क्रमांक मधे आला. प्राची बापू लकडे (वयोगट- १६ लांब उडी ) तृतीय क्रमांक घेतला ,सिद्धी प्रकाश चवरे (वयोगट- १४ लांब उडी ) तृतीय क्रमांक ,सर्वेश प्रशांत शिपटे ( वयोगट१९ *१००मीटर धावणे ) तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ चवरे, सचिव- अमोल चवरे, प्राचार्य सौ. कांचन मॅडम , तांबे सर, शाळेचे क्रिडा शिक्षक महादेव वाघमोडे तसेच शिक्षक , शिक्षिका व पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.